शुक्रवार, १२ डिसेंबर, २००८

एक कविता..

माझ्या मृत पडलेल्या
शरीराकडे पाहून....
मी जेव्हा नि:शब्द हुन्कारतो
तेव्हा त्या हुन्काराला दर्प येतो
माझ्या सुप्त अस्मितेचा...
पण, एक तप्त हुन्दक्याचे चढते त्यावर कवक,
आणि निरामय वातावरणात
जागृत होतो एक दिशाहीन गंध!

पण कुणीतरी कुजबुजत
"उचला लवकर,
बॉडीला वास येवू लागलाय"

1 टिप्पणी:

SanjaySonar म्हणाले...

नंदू, नवीन काही लिहिलेस का?
तुझी जुनी "प्राक्तन" कविता पोष्ट कर ना.